स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभक्तीपर वातावरण निर्मिती करत “हर घर तिरंगा” मोहिमेचा भाग म्हणून जिल्ह्यात अनेक ठिकाणी तिरंगा रॅल्या काढण्यात आल्या. यामध्ये धानोरा येथे विद्यार्थ्यांनी काढलेली 90 मीटर लांबीची तिरंगा यात्रा विशेष आकर्षण ठरली. तसेच गोंडवाना विद्यापीठातील आदर्श पदवी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तिरंगा रॅलीद्वारे घरोघरी तिरंगा फडकविण्याबरोबरच त्याचा योग्य सन्मान राखण्याबाबत जनजागृती केली. याशिवाय इंदिरा गांधी चौकातून तिरंगा सायकल रॅलीही काढण्यात आली.