गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यावर पुन्हा एकदा पुराचे संकट ओढवले आहे. छत्तीसगडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रावती, पर्लकोटा आणि पामुलगौतम नद्यांची पातळी वाढली. पर्लकोटा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने शंभराहून अधिक गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. मध्यरात्री पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली, तर प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवून सतर्कतेचे आवाहन केले आहे.