गणपती बाप्पा मोरया म्हणत आपण उत्साहपूर्ण आणि
भक्तिमय वातावरणात
गणपती बाप्पांचा आगमन सोहळा साजरा करतो…
आजच्या घडीला 100 पैकी 90 जणांच्या घरात
प्रेम श्रद्धा भक्तिभावाने
गणपती बाप्पा विराजमान होतात,
पण सार्वजनिक गणेश मंडळांचा विषय निघतो तेव्हा
विचित्र वास्तव बघायला मिळते,
एकाच कॉलनीत, एकाच रस्त्यावर तीन तीन
मंडळे उभे राहिलेले दिसतात..
यावरून प्रश्न पडतो कि,
आपण एकत्र येण्याऐवजी विभागले तर जात नाहीयेत ना…?
पण तुम्हाला माहितीये का…?
सार्वजनिक गणेशोत्सवाची खरी सुरुवात कोणी केली…
लोकमान्य बाल गंगाधर टिळक यांनी 1893 मध्ये
सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती…
या उत्सवाचा मुख्य हेतू समाजातील विविध घटक एकत्र आणणे
आणि राष्ट्रीय एकतेला चालना देणे हा होता.
तेव्हा गणेशोत्सव हा उत्सव होता एकतेचा
आणि आजचा हाच उत्सव आहे स्पर्धेचा…
खरंच आपण गणेशोत्सवाच्या नावाने
एकत्र येतोय की विभागले जातोय हे आपणच ठरवायला पाहिजे
आजच्या या स्टोरी मधून तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट करून सांगा
गणपती बाप्पा मोरया तर सर्वच म्हणतात, पण मोरया ‘च’ का…?
हे जाणून घेऊया पुढील भागात..