अनलासुर ते दुर्वा इथपर्यंतचा प्रवास – गणेशभक्तीची अद्भुत कथा
कथा गणपतीची, समज दुर्वांची
गणांचे अधिपती गणपती बाप्पा
सर्वत्र विराजमान झाले आहे.
गणपती बाप्पांच्या पूजेत
सर्वात महत्त्वाचं स्थान -दुर्वांना आहे.
तुम्हाला माहितीये का गणपती बाप्पांच्या
डोक्यावर दुर्वा का वाहतात…
यामागे एक पौराणिक कहाणी आहे,
अनलासुर नावाच्या राक्षसाची…
या राक्षसाने देवी देवता –
ऋषी मुनींना त्रास दिला होता.
त्यामुळे सगळे त्रस्त होऊन गणेशाकडे गेले…
त्यांनी गणेशाला प्रार्थना केली कि,
आम्हाला या राक्षसापासून वाचवा
त्यानंतर गणपती बाप्पांनी अनलासुराला गिळले होते
अनलाचा अर्थ होतो अग्नी – आग …
त्यामुळे गणपती बाप्पांच्या पोटात
जळजळ होऊ लागली…
हि आग शांत करण्यासाठी
कश्यप ऋषींनी २१ दुर्वांची जुडी
गणपती बाप्पांना खायला दिली होती…
दुर्वामध्ये थंडावा देणारे गुणधर्म असतात…त्यामुळे
त्यांच्या अंगातील जळजळ शांत होऊन
त्यांना आराम मिळाला….
तेव्हापासून गणपती बाप्पांना २१ जुडी दुर्वा अर्पण केल्या जातात…
गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करण्यामागे एक वैज्ञानिक दृष्टीकोन देखील आहे…
दुर्वांमध्ये थंडावा देणारे गुणधर्म असतात, आणि ते उर्जा संतुलित करण्यास
मदत करतात…
त्यामुळे बाप्पांची पूजा करताना एक पवित्र वातावरण निर्माण होते…
म्हणून यंदा गणपती बापांच्या पूजेत दुर्वाचे महत्व लक्षात ठेऊन
त्यांना भक्तिभावाने दुर्वा अर्पण करा…
पुढील भागात पहा …
जास्वंदीच्या फुलाची पारंपारिक गाथा, कथा गणपती बाप्पाच्या प्रिय फुलाची












