या वर्षी गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यासाठी सरकार सज्ज झाली आहे. मंडळे आणि घरगुती गणेश आरास स्पर्धा चौक-चौकात आयोजित होणार असून रोषणाई, ड्रोन शो आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. यासाठी 11 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केली.