ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके सतत दोन जातीत तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल देखील एकेरी भाषेत बेताल वक्तव करत आहेत. लक्ष्मण हाकेंनी जातीय तेढ निर्माण करू नये. अन्यथा त्यांची जीभ आसडली जाईल. जो कोणी लक्ष्मण हाके यांची जीभ आसडेल त्याला लाख रुपये बक्षिस देऊ अशी घोषणा मनोज जरांगे यांचे समर्थक मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी केली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 29 तारखेला मुंबईत मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन आहे. त्याच पार्श्वभूमीवर ओबीसी आणि मराठा आंदोलकांची शाब्दिक बाचाबाची समोर येत आहे.