गणेशोत्सव सणाच्या निमित्त गौरीच्या मुर्त्या व मुखवट्यांनी नवी मुंबईतील बाजारपेठ सजली असून, नागरिकांची खरेदीसाठी दुकानात गर्दी पाहायला मिळत आहे. गौरीच्या मुर्त्या व मुखवटे 1000 ते 8000 रुपयांपर्यंत मिळत असून, फायबरने बनवलेल्या मुर्त्यांना जास्त मागणी आहे. पीओपीच्या मुर्त्यांना यावेळी मागणी कमी असल्याचे दुकानदारांनी सांगितले. त्याच बरोबर या मुर्त्या सातारा, सांगली, भोर, कराड याठिकाणाहून बाजारात दाखल झाल्या आहेत.