मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदान येथे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणार्थ आज हिंगोलीच्या वसमत मालेगाव रोडवरील गिरगाव फाटा परिसरात मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून शांततेच्या मार्गाने रास्ता रोको करण्यात आला. या आंदोलनात गिरगाव सह अनेक गावातील सकल मराठा बांधव सहभागी झाले होते या रास्ता रोकोला पोलिसांचा चौक बंदोबस्त देखील पाहायला मिळाला आणि दोन्हीही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा देखील पाहायला मिळाल्या.