आंध्रप्रदेशच्या सत्य साई जिल्ह्यात एका इंटरमीडिएट विद्यार्थिनीने फ्रेशर्स पार्टीसाठी नव्या साडीची मागणी केली असता आईने तिला नवी साडी न दिल्यामुळे आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्या विद्यार्थिनीने जुन्या साडीने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले, पुढील चौकशी सुरु आहे.