सोलापूरमध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी हत्येचा प्रयत्न करण्यात आला. आरोपी अमित सुरवसे आणि त्याच्या साथीदारांवर हत्येच्या उद्देशाने अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली असून तपास सुरू आहे.