गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सातत्यानं मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. परिणामी, धरणाच्या जलसाठ्यात वाढ झाल्यानं जलसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाचे सर्वच्या सर्व ३३ दरवाजे अर्धा मीटरनं उघडण्यात आली आहे. धरणातून १ लाख ३३ हजार ६९० क्युसेक वेगानं पाणी सोडण्यात येत आहे. पावसानं तीन मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहे. यात भंडारा ते कारधा, पवनी तालुक्यातील सावरला ते खातखेडा, सावरला ते विलम हे मार्ग बंद करण्यात आले आहे.