बीड जिल्ह्यातील व्यापारी महादेव मुंडे हत्येच्या आरोपी गोट्या गीतेचे अनिल उर्फ आप्पा दळवीसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. परिसरात गोट्याचा गॉड फादर आप्पा दळवी असल्याची चर्चा आहे. पोलिसांनी गोट्याचा शोध घेतला असून, नागरिकांकडून आप्पा दळवीच्या चौकशीची मागणी केली जात आहे. गोट्या गीतेचे व्हिडिओ आणि फोटो सध्या चर्चेचा विषय बनले आहेत.