बीडमध्ये महादेव मुंडे हत्या प्रकरणातील फरार आरोपी गोट्या गीतेने एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. रेल्वे रुळावर बसून आत्महत्या करण्याचा इशारा देत गोट्याने आमदार जितेंद्र आव्हाडांना जबाबदार ठरवले. “आव्हाड यांनी आरोप थांबवले नाहीत तर मी आत्महत्या करेन,” असा इशारा गोट्याने दिला आहे. व्हिडीओने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला असून, यावर काही कारवाई होईल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.