बीड जिल्ह्यातील वडवणी न्यायालयात सरकारी वकील विनायक चंदेल यांनी गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या प्रकरणात मोठा धक्का बसला आहे. चंदेल यांच्या सुसाईड नोट व कुटुंबीयांच्या फिर्यादीच्या आधारे न्यायाधीश रफिक शेख आणि लिपिक तायडे यांच्यावर गुन्हा नोंदवला गेला आहे. वारंवार होणाऱ्या त्रासामुळे त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचं समोर आलं असून, एका न्यायाधीशावर गुन्हा नोंदवला जाण्याची ही दुर्मीळ वेळ मानली जाते. प्रकरणाचा पुढील तपास वडवणी पोलिसांकडून सुरू आहे.