परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या अपमानास्पद वक्तव्यामुळे ग्रामपंचायत अधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी उसळली आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या कार्यक्रमात अधिकाऱ्याला धमकीच्या स्वरूपात बोलल्याचा आरोप आहे. या निषेधार्थ ४ ऑगस्ट रोजी काळी फीत लावून शांततापूर्ण आंदोलन करण्यात आलं. पंचायत समिती आमगावमध्ये अधिकाऱ्यांनी एकत्र येत तीव्र संताप व्यक्त केला.
(RNO)