अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राहाता पंचायत समिती कार्यालयात अचानक झाडाझडती घेतली. जलजीवन योजनेच्या आढावा बैठकीसाठी आले असताना त्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता विविध विभागांच्या कार्यालयांची पाहणी केली. स्वच्छतागृहांमध्ये अस्वच्छता पाहून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली, आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणावर गंभीर चिंता व्यक्त केली.