गणेशोत्सवानिमित्त पुणेकरांनी मार्केट यार्डमध्ये फूल खरेदीसाठी गर्दी केली आहे. यंदा गुलछडीच्या फुलांनी चांगलाच भाव खाल्ला आहे. पुण्यातल्या फूल मार्केटमध्ये मोदकापेक्षाही गुलछडीची फुलं महाग असल्याचं चित्र आहे. मुसळधार पावसामुळे आणि आवक कमी असल्यानं गलछडीची फुलं पंधराशे ते अठराशे रुपये किलोनं विकली जात आहेत.