उत्तर प्रदेश मधील अमोरहा येथे सासरच्या मंडळींनी हुंड्याच्या दबावाखाली गुलफिजाला acid पाजल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तब्बल 17 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर गुलफिजाचा मोरादाबाद येथील रुग्णालयात मृत्यू झाला. लग्नानंतरपासून पती व सासरचे लोक सतत हुंड्यासाठी छळ करत असल्याचा आरोप पीडितेच्या वडिलांनी केला आहे.