भाजप नेते व माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी हिमाचल प्रदेशात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना हनुमानजींनाच ‘पहिले अंतराळ प्रवासी’ म्हटलं. राष्ट्रीय अवकाश दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ठाकूर म्हणाले, “आपण फक्त पुस्तकांपलीकडे पाहून आपल्या परंपरा, संस्कृती आणि ज्ञानाशी जोडले गेलं पाहिजे.” त्यांनी हा संवादाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर शेअर करत कॅप्शन दिलं “पवनसुत हनुमान जी… द फर्स्ट ॲस्ट्रोनॉट.”