Brain Tumor Symptoms: आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेकांना सतत डोकेदुखीचा त्रास जाणवतो. त्यामुळे अनेक जण याकडे दुर्लक्ष करून मेडिकलमधून औषधे घेतात. मात्र, सतत डोकेदुखी होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते.
आजकालच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीमुळे डोकेदुखी ही एक सामान्य तक्रार बनली आहे. अनेकदा लोक या त्रासाकडे दुर्लक्ष करून स्वतःच मेडिकलमधून औषधे घेतात किंवा विश्रांती घेतल्यावर बरे होईल असे समजतात. मात्र सतत किंवा वारंवार होणारी डोकेदुखी (Headache Symptoms) ही नेहमीच साधी समस्या (Brain Tumor Headache) नसते. काही वेळा ती शरीरात किंवा मेंदूमध्ये सुरू असलेल्या गंभीर ट्यूमरच्या (Brain Tumor Signs) बदलांचे संकेतही असू शकते. त्यामुळे अशा लक्षणांकडे वेळीच लक्ष देणे अत्यंत गरजेचे ठरते.
न्यूरोसर्जन यांच्या मते, ट्यूमर वाढत गेल्यास सतत डोकेदुखी, फिट्स (Seizures), दृष्टीसंबंधी समस्या, शरीराच्या एखाद्या भागात कमजोरी किंवा बोलण्यात अडचण यांसारखी लक्षणे दिसू शकतात.
हेही वाचा: अग्निवीरासाठी मोठा दिलासा! सेवेतून काढण्याचा लष्कराचा निर्णय AFTने फेटाळला; पुन्हा नियुक्तीचे आदेश
वेगळ्या प्रकारची डोकेदुखी (Brain Tumor Headache)
ब्रेन ट्यूमरमुळे होणारी डोकेदुखी ही सामान्य तणावामुळे होणाऱ्या डोकेदुखीपेक्षा वेगळी असते. ही वेदना हळूहळू वाढते आणि वारंवार त्रास देते. विशेषतः सकाळच्या वेळी ती अधिक तीव्र असू शकते. खोकताना, वाकताना किंवा झोपल्यावरही वेदना वाढू शकते. अनेक जण याला झोपेची कमतरता किंवा तणाव कारणीभूत असल्याचे समजतात. मात्र डोकेदुखी सतत होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
सुरुवातीची लक्षण कोणती? ( Brain Tumor Symptoms)
सतत मळमळ किंवा उलट्या होणे
सकाळी वारंवार मळमळणे किंवा उलट्या होणे हे मेंदूमधील वाढलेल्या दाबाचे लक्षण असू शकते. अनेकदा याकडे अॅसिडिटी किंवा पचनाशी संबंधित समस्या म्हणून पाहिले जाते. मात्र ही समस्या वारंवार होत असेल तर ती गंभीर असू शकते.
दृष्टीशी संबंधित समस्या
काही वेळा ट्यूमर मेंदूतील दृष्टी नियंत्रित करणाऱ्या भागांवर परिणाम करतो. त्यामुळे धूसर दिसणे, दुहेरी दिसणे किंवा काही काळासाठी दृष्टी जाणे यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. याशिवाय तेजस्वी प्रकाश दिसणे किंवा बाजूचे नीट न दिसणे अशी लक्षणेही दिसू शकतात. अनेक जण यामागे मोबाईल किंवा स्क्रीनचा अतिवापर करणीभूत असल्याचे मानतात, पण हे धोकादायक ठरू शकते.
स्मरणशक्ती आणि एकाग्रतेवर परिणाम
वारंवार गोष्टी विसरणे, लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणे, गोंधळल्यासारखे वाटणे किंवा बोलताना योग्य शब्द आठवत नसणे ही देखील ब्रेन ट्यूमरची लक्षणे असू शकतात. अनेकदा याचा संबंध मानसिक तणाव किंवा बर्नआउटशी जोडला जातो.
चक्कर येणे
चालताना अडचण येणे, वारंवार चक्कर येणे, शरीराचा समतोल बिघडणे किंवा हालचालींमध्ये समन्वयाचा अभाव जाणवणे ही गंभीर लक्षणे ठरू शकतात. अनेक जण याला अशक्तपणा किंवा रक्तदाबाशी संबंधित समस्या समजतात.
उपचार कसे केले जातात?
ब्रेन ट्यूमरचा उपचार त्याचा प्रकार, आकार आणि मेंदूमधील स्थान यावर अवलंबून असतो. सध्या या आजारासाठी अनेक प्रगत उपचारपद्धती उपलब्ध आहेत. रुग्णाच्या स्थितीनुसार शस्त्रक्रिया (Surgery), रेडिएशन थेरपी, कीमोथेरपी यांसारख्या उपचारांचा वापर केला जाऊ शकतो.








