नांदेड जिल्ह्यात पंधरा दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाने हाहाकार सुरू झाला आहे, काल दुपारपासून नांदेड जिल्ह्यातील नायगाव, देगलूर, बिलोली, धर्माबाद, मुखेड, कंधार तालुक्यात पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे ,या तालुक्यातील 17 मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. कंधार तालुक्यातील चिखली व नायगाव तालुक्यातील नरसी गावामध्ये पाणी शिरल्याने रस्त्याच्या बाजूला असलेले दुकान व वाहने यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. नागरिकांनी सखोल पाण्यात किंवा कमी उंचीच्या पुलावरून जाण्याचे टाळावे व नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.