अहमदपूरात मोठे नुकसान
गणरायाच्या आगमनानंतर लातूर जिल्ह्यात मुसळधार पावसाने दैना उडवली आहे. नदी-नाले, तलाव व बंधारे ओसंडून वाहत असून अहमदपूर तालुक्यात शेतपिकांचे मोठे नुकसान झाले. ६५९ पशुधन दगावले, तर ८० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. पूरामुळे जिल्ह्यातील ६७ मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले असून, बचावासाठी सैन्यदलाला पाचारण करण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी नदी-तलाव परिसरात न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून शेतकरी तातडीने पंचनामे करून भरपाईची मागणी करत आहेत.