वाशिम जिल्ह्यात १५ ते १८ ऑगस्ट या कालावधीत झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, या दुर्घटनेत जनावरांचे मृत्यू, शेतीपिकांचे नुकसान व घरांची पडझड झाली आहे. यात एका व्यक्तीसह ३५ जनावरे आणि ३ हजार कोंबड्यांचा मृत्यू झाला असून घरांची देखील परझड झाली आहे.या धक्क्यातून सावरण्यासाठी शासनाकडून कधी मदत मिळेल. याकडे नुकसानग्रस्तांचे लक्ष लागले आहे.