सांगली जिल्ह्यातील चांदोली धरण परिसरात गेल्या 24 तासांत तब्बल 83 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सध्या धरण 91.80% भरले असून 31.58 टीएमसी पाणी साठा आहे. वार्षिक पर्जन्यमान 2262 मिमी इतके झाले आहे. सततच्या पावसामुळे चांदोली आणि वारणा धरणांमध्ये जलपातळी वाढली असून धरण प्रशासनाने वारणा नदीपात्रात 900 क्युसेक विसर्ग सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असून, परिस्थितीनुसार विसर्ग कमी-जास्त केला जाईल.