कालपासून दिवसभर मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्याचे जण जीवन विस्कळीत झाले होते .काल रात्री पावसाने विसावा घेतल्या नंतर पुन्हा सकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.आज सकाळी महाड तालुक्यातील शिवथर विभागात ढग फुटी सदृश्य पाऊस पडला.या पावसामुळे कुंभेशिवथर गावातील स्मशान भूमी वाहून गेली आहे.त्याच प्रमाणे आंबेशिवथर,अंबेनळी,सह्याद्री वाडी गावाचा देखील काहीकाळ संपर्क तुटला होता. त्यामुळे शिवथर विभागातील नागरिक सरंक्षण भितींची आणि आंबेशिवथर ग्रामस्थ नवीन पुलाची मागणी प्रशासनाकडे करत आहेत.