अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेरजवळील घुलेवाडी गावात हभप संग्राम बापू महाराज भंडारे यांच्यासोबत झालेल्या धक्काबुक्कीच्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी आज हिंदुत्ववादी संघटनांनी रास्ता रोको आंदोलन केलं. या आंदोलनात आमदार अमोल खताळ आणि भाजप अध्यात्मिक सेलचे अध्यक्ष तुषार भोसले सहभागी झाले. कीर्तनादरम्यान राजकीय भाष्य केल्याने वाद निर्माण झाला आणि आठ ते दहा जणांनी महाराजांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.