अकोला-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील बासंबा फाटा शिवारातील पुलावर आणि हिंगोली येथील दंत महाविद्यालयाजवळ आज सकाळी मालवाहतूक करणाऱ्या छोट्या पिकअपचा भीषण अपघात झाला. वेगावर नियंत्रण सुटल्याने वाहन पुलावर आदळले, यात चालक आणि वाहकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.