आज काल एका पुरस्काराचे नाव वारंवार समोर येत आहे, तो म्हणजे जगातील सर्वात श्रीमंत आणि बलाढ्य अमेरिकेचे पहिले रहिवासी व राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प. ह्यांना नोबेल पुरस्काराची एवढी भूक लागली आहे की त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी मागील सहा महिन्यात सहा युद्ध रोकल्याची पुष्टी केली आणि ज्यांनी ट्रम्प साहेबांचा विरोध केला त्या देशांवर टॅरीफ वर टॅरीफ लावण्यात अली बाबी त्यात भारत सुद्धा वाचला नाही. पण हा पुरस्कार एवढा महत्वाचा का आहे? चला पाहूया काय आहे नोबेल पुरस्कार.
नोबेल पुरस्काराची सुरुवात
नोबेल पुरस्कार ही जगातील सर्वात प्रतिष्ठित सन्मानाची शृंखला आहे.
हा पुरस्कार स्वीडिश शास्त्रज्ञ, संशोधक व उद्योगपती अल्फ्रेड नोबेल यांच्या इच्छापत्रावर आधारित आहे.
- अल्फ्रेड नोबेल (1833-1896) हे डायनामाईटचे शोधक होते.
- 1888 मध्ये एका फ्रेंच वृत्तपत्राने चुकून त्यांचा मृत्युलेख छापला आणि त्यांना “मर्चंट ऑफ डेथ” (मृत्यूचा व्यापारी) असे संबोधले.
- ही गोष्ट नोबेल यांना खूप लागली. त्यांना वाटले की, आपल्या मृत्यूनंतर लोक फक्त शस्त्रास्त्रे व स्फोटके यामुळे आपली आठवण ठेवतील.
- त्यामुळे त्यांनी आपली प्रतिमा बदलण्यासाठी आणि समाजाला लाभ होईल असा वारसा मागे ठेवण्यासाठी 1895 मध्ये नवीन वसीयत (Will) लिहिली.
या वसीयतानुसार त्यांच्या संपत्तीतील मोठा भाग एका निधीत ठेवण्यात यावा आणि त्या निधीतून दरवर्षी असे लोक गौरवले जावेत ज्यांचे कार्य “मानवजातीच्या सर्वांत मोठ्या भल्यासाठी” उपयुक्त ठरले असेल.
नोबेल फाउंडेशनची स्थापना
- अल्फ्रेड नोबेल यांचे निधन 1896 मध्ये झाले.
- त्यांच्या वसीयतवर सुरुवातीला कुटुंबीय व समाजाने आक्षेप घेतले, कारण एवढी मोठी संपत्ती पुरस्कारासाठी द्यायची कल्पना लोकांना वेगळी वाटली.
- 1897 मध्ये नॉर्वेच्या संसदेत वसीयत मंजूर झाली.
- 1900 मध्ये नोबेल फाउंडेशन अधिकृतपणे स्थापन करण्यात आले, ज्याचे काम नोबेल पुरस्काराचे आयोजन व निधी व्यवस्थापन करणे आहे.
पहिला नोबेल पुरस्कार
- 10 डिसेंबर 1901 रोजी, नोबेल यांच्या मृत्यूच्या पाचव्या पुण्यतिथीला, पहिल्यांदा नोबेल पुरस्कारांचे वितरण झाले.
- सुरुवातीला पाच क्षेत्रांमध्ये पुरस्कार दिला जात होता:
- भौतिकशास्त्र (Physics)
- रसायनशास्त्र (Chemistry)
- शरीरशास्त्र/वैद्यकशास्त्र (Medicine)
- साहित्य (Literature)
- शांतता (Peace)
- नंतर, 1968 मध्ये स्वीडनच्या सेंट्रल बँकेने (Sveriges Riksbank) अर्थशास्त्रासाठी स्वतंत्र पुरस्कार सुरू केला, ज्याला “नोबेल मेमोरियल प्राईज इन इकॉनॉमिक सायन्सेस” म्हटले जाते.
नोबेल पुरस्कार निवड प्रक्रिया
नोबेल पुरस्कार मिळवणे ही एक अतिशय कडक, गुप्त आणि दीर्घ प्रक्रिया असते.
नामनिर्देशन:
- नोबेल समित्या हजारो शास्त्रज्ञ, संशोधक, विद्वान व मागील विजेत्यांना उमेदवार सुचवण्याचे निमंत्रण देतात.
- स्वतःचे नाव सुचवणे परवानगी नाही.
- ही नामावली 50 वर्षे गुप्त ठेवली जाते.
प्राथमिक निवड:
- समित्या नामांकनांची तपासणी करून काही महत्त्वाचे उमेदवार निवडतात.
तज्ञांचे परीक्षण:
- निवडलेल्या उमेदवारांच्या कार्याचे सखोल परीक्षण जागतिक तज्ञांकडून केले जाते.
अंतिम निर्णय:
- ऑक्टोबर महिन्यात संबंधित संस्था मतदान करून अंतिम विजेते जाहीर करतात.
- हा निर्णय अंतिम असतो आणि त्यावर अपील करता येत नाही.
पात्रता
- जिवंत व्यक्तींनाच पुरस्कार मिळतो.
जर ऑक्टोबरमध्ये विजेता जाहीर झाल्यानंतर पण डिसेंबरपूर्वी त्यांचा मृत्यू झाला तर पुरस्कार दिला जातो. पण मृत व्यक्तीस आधीच पुरस्कार घोषित करता येत नाही.
- कमाल तीन लोकांना एका पुरस्कारात सामावून घेता येते.
- शांततेचा नोबेल पुरस्कार संस्थेलाही दिला जाऊ शकतो.
- राष्ट्रीयतेशी काही देणेघेणे नाही फक्त कार्याची “गुणवत्ता व मानवजातीस लाभ” हा निकष असतो.
पारितोषिक
- प्रत्येक विजेत्याला रोख रक्कम, पदक आणि प्रमाणपत्र दिले जाते.
- 2023 मध्ये पूर्ण पुरस्काराची रक्कम ११ दशलक्ष स्वीडिश क्रोनर इतकी होती.
- पदक: 1980 पूर्वीची पदके 23 कॅरेट सोन्याची होती.
1980 नंतर 18 कॅरेट “ग्रीन गोल्ड” वर 24 कॅरेट सोन्याची पॉलिश दिली जाते.
पहिले नोबेल विजेते (1901)
- भौतिकशास्त्र: विल्हेल्म रॉन्टगेन (जर्मनी) – एक्स-रेचा शोध.
- रसायनशास्त्र: जेकबस हेन्रिकस व्हॅन ’ट हॉफ (नेदरलँड्स) – रासायनिक डायनॅमिक्सवरील काम.
- वैद्यकशास्त्र: एमिल व्हॉन बेहरिंग (जर्मनी) – डिप्थेरिया या आजारासाठी सिरम थेरपी.
- साहित्य: सुली प्रुधोम (फ्रान्स) – त्यांच्या कवितांसाठी.
- शांतता: हेन्री ड्युने (स्वित्झर्लंड) – रेड क्रॉसचे संस्थापक व
फ्रेडरिक पासी (फ्रान्स) – पीस लीगचे संस्थापक.
थोडक्यात, नोबेल पुरस्कार हा केवळ पैशाचा सन्मान नसून, तो मानवजातीच्या भल्यासाठी केलेल्या कार्याची जागतिक पातळीवरील सर्वात मोठी मान्यता आहे.
-अमित आडते
लेखक