मुंबईतील डबेवाल्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २५.५० लाख रुपयांत ५०० चौरस फुटांचे घर देण्याची घोषणा केली आहे. प्रधानमंत्री आवास योजना आणि इतर शासकीय योजनांच्या माध्यमातून हा परवडणारा गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे. वांद्रे पश्चिम येथील ‘डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्रा’च्या उद्घाटनावेळी त्यांनी ही घोषणा केली. 135 वर्षांच्या प्रवासात डबेवाले संगणक किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स न वापरता मानवी बुद्धिमत्तेच्या जोरावर जगप्रसिद्ध व्यवस्थापन कौशल्य दाखवत आले आहेत.