बीड जिल्हा रुग्णालयातील वार्ड क्रमांक 46 मध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. रुग्णाच्या बेडवरच छताचा भाग कोसळला असून मोठमोठे सिमेंटचे तुकडे खाली पडले. पावसाच्या झिरप्यामुळे हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे. सुदैवाने रुग्ण बालक सुखरूप बचावले, अन्यथा मोठी जीवितहानी झाली असती. या घटनेनंतर जिल्हा रुग्णालयाच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नुकतेच पालकमंत्री अजित पवार यांनी या रुग्णालयाला अचानक भेट दिली होती, तर बांधकामातील ढिसाळपणावरून याआधी आंदोलनही झाले होते.