राज्यात HSRP प्लेट बसवण्याची अंतिम मुदत 15 ऑगस्ट 2025 होती, मात्र 14 ऑगस्ट रोजी राज्य सरकारने ही मुदत 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत वाढवली. 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांकडून कमी प्रतिसाद मिळाल्याने हा निर्णय घेण्यात आला. 1 डिसेंबरपासून नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होईल, मात्र 30 नोव्हेंबरपूर्वी अपॉइंटमेंट असलेल्या वाहनधारकांना सूट राहील.