HSRP म्हणजेच हाय स्पीड रजिस्ट्रेशन प्लेट लावून घेण्यासाठी नवी मुंबईत 49 केंद्रावर कामे सुरु असून, आत्तापर्यंत 94 हजार 311 वाहनानी HSRP नंबर प्लेट लावण्यासाठी अर्ज केले आहेत. त्यापैकी 73 हजार 967 वाहनांना HSRP नंबर प्लेट लावण्यात आले आहेत. ह्या नंबर प्लेट बसवून घेण्यासाठी ऑनलाईन सुविधा देखील असून, HSRP नंबर प्लेट लावून घेण्यासाठी नागरिकांना 30 नोव्हेंबर पर्यन्त मुदत वाढ देण्यात आली आहे.