जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील लोहारा गावात एक थरकाप उडवणारी घटना घडली आहे. कौटुंबिक कलह, संशय आणि पैशाच्या तगाद्यातून पतीने झोपेत असलेल्या पत्नीवर धारदार शस्त्राने वार करत तिची हत्या केली. या भयानक कृत्यानंतर आरोपी पती स्वतः पोलिस ठाण्यात हजर झाला. या घटनेनं संपूर्ण परिसर हादरून गेला आहे..याप्रकरणी आरोपीची चौकशी सुरु आहे.