अकोल्याच्या पातूर तालुक्यातील गावंडगावात 21 वर्षीय रुपेश राठोडने दारूच्या नशेत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे गावकऱ्यांनी पोलिसांच्या छत्रछायेखाली अवैध दारू विक्री होत असल्याचा आरोप केला आहे. सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी अनेकदा तक्रारी केल्या तरी दारूचा धंदा बंद झाला नाही, असा दावा केला. पोलीस ‘मिशन उडान’ अंतर्गत कारवाई करत आहेत, पण त्याचा परिणाम गावकऱ्यांना दिसत नाही असं त्यांचं म्हणणं आहे.