माणगाव तालुक्यातील कोस्ते बुद्रुक गावात बेकायदेशीर खाणकाम आणि क्रशर उद्योगामुळे शेतजमिनींचे नुकसान होत असल्याने ग्रामस्थांनी प्रशासनाकडे कारवाईची मागणी केली आहे. नियम धाब्यावर बसवून सुरू असलेला हा प्रकार तात्काळ थांबवून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी गावकऱ्यांची मागणी आहे.