कराड शहरात पोलिसांनी मोठी कारवाई करत गावठी कट्टा व चार जिवंत काडतुसे जप्त केली. गणेशोत्सव व निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात असून उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार मौजे गोवारे येथील गजानन को-ऑप हौसिंग सोसायटी परिसरात काही संशयित अवैध शस्त्रासह थांबले होते. पोलिसांनी सापळा रचून त्यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून गावठी कट्टा सोबत 94,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.