भारत आणि चीन यांच्यातील थेट विमानसेवा पुढील महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. दोन्ही देश राजनैतिक संबंध सुधारण्याच्या प्रयत्नात असून, भारतीय विमान कंपन्यांना अल्पावधीत चीनसाठी उड्डाणांची तयारी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अधिकृत घोषणा चीनमधील शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन शिखर परिषदेत होऊ शकते.