ACC पुरुष एशिया कप T20 साठी भारताची १५ सदस्यीय टीम जाहीर करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादव कर्णधार असून शुभमन गिल उपकर्णधार आहेत. संघात अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन, हर्षित राणा आणि रिंकू सिंग यांचा समावेश आहे. स्टँडबायमध्ये प्रसिद्ध कृष्णा, वॉशिंग्टन सुंदर, रियान पराग, ध्रुव जुरेल आणि यशस्वी जयसवाल ठेवण्यात आले आहेत. सामना युएईमध्ये ९ ते २८ सप्टेंबरदरम्यान होणार आहे.