भारतीय खासगी क्षेत्राच्या अर्थव्यवस्थेने अभूतपूर्व झेप घेतली असून HSBC फ्लॅश इंडिया कॉम्पोजिट पीएमआय ऑगस्टमध्ये 65.2 वर पोहोचला आहे. जुलैतील 61.1 च्या तुलनेत तब्बल चार अंकांची वाढ नोंदवत ही 2005 नंतरची सर्वात जलद गती ठरली. उत्पादन क्षेत्रासोबत सेवा क्षेत्रानेही विक्रमी कामगिरी केली असून एचएसबीसी फ्लॅश इंडिया सर्व्हिसेस पीएमआय 60.5 वरून थेट 65.6 वर झेपावला आहे.