जळगाव शहरातील बेंडाळे चौकाजवळ पहाटे ३ वाजता २६ वर्षीय विशाल ऊर्फ विक्की रमेश मोची या तरुणाची अज्ञात ६ ते ७ हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. गंभीर जखमी झाल्याने तो जागीच मृत झाला. मृत विशाल मोची हा रामेश्वर कॉलनीत राहत होता व सोलर पॅनेल बसवण्याचं काम करत होता. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.