जळगाव एमआयडीसी परिसरातील एच सेक्टरमधील हॉटेल तारा येथे देहविक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळताच रात्री अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या (AHTU) पथकाने धाडसी कारवाई केली. या छाप्यातून तीन महिलांची सुटका करण्यात आली असून, त्यातील दोन महिला बांगलादेशी असल्याचे समोर आले आहे.