गणेशोत्सव तसेच आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जालन्यात कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने पथसंचलन करण्यात आले. यावेळी जालना सदर बाजार पोलीस ठाणे, चंदनजीरा पोलीस ठाणे, तालुका पोलीस ठाणे आणि कदिम पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शहर वाहतूक कार्यालयापासून सावरकर चौक, फुल बाजार, सराफा बाजार, पाणीवेस, गांधी चमन, शनी मंदिर मार्गे जात मुक्तेश्वर द्वाराजवळ या पथसंचलनाचा समारोप करण्यात आला.
Byte-अनंत कुलकर्णी,उपविभागीय पोलिस अधिकारी