राजूर रोडवरील राजूर चौफुली परिसरात आज सकाळी भीषण अपघात घडला. मालवाहू ट्रकने ॲपे रिक्षाला जोरदार धडक दिल्याने रिक्षातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये भरत निवृत्ती खोसे, गणेश तुकाराम बोरसे आणि सुनिता नारायण वैद्य यांचा समावेश आहे. हे तिघे जण जालन्याहून बदनापूर तालुक्यातील मांडवा गावाकडे जात असताना हा अपघात झाला. धडक इतकी भीषण होती की रिक्षाचे मोठे नुकसान झाले. घटनेनंतर ट्रक चालक पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्याला पाठलाग करून ताब्यात घेतले.