मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने चंद्रपुरात निदर्शने करत निषेध करण्यात आला. भाजपा चे ओबीसी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अशोक जिवतोडे यांच्या नेतृत्वात चंद्रपुरात निषेध आंदोलन करण्यात आले. जरांगे यांचा सरसकट मराठ्यांना ओबीसीत आणण्याचा हट्ट पूर्ण होवू देणार नसल्याचा इशारा देण्यात आलाय.