मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा आंदोलक मुंबईकडे निघाले. मात्र जरांगे पाटील यांच्या ताफ्यातील वाहनांवर काही लोकांनी दगडफेक केल्याची धक्कादायक घटना अहिल्यानगर जिल्ह्यात घडली असून काही गाड्यांचे नुकसान झाले आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.