कोरेगाव येथील पत्रकार नवनाथ पवार यांना महसूल अधिकारी प्रशांत पवार याने “मटक्याची बातमी का लावली?” अशी विचारणा करत मारहाण केली. या घटनेनंतर कोरेगाव तालुक्यातील पत्रकारांनी संताप व्यक्त करून पत्रकार संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल करण्याची आणि आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी पोलीस ठाण्यात निवेदनाद्वारे केली. पत्रकारांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत पत्रकार सुरक्षेसाठी कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले.