कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांवरील खड्डे पडून रस्त्यांची पूरती वाट लागली आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिक आणि वाहन चालक हैराण आहेत. रस्त्यावरील खड्ड्यांवरुन नागरिकांचा संताप अनावर होत असताना कल्याण पूर्वेतील एका इमारतीच्या समोर चिखलाची वाट आहे. तिथे रस्ता नाहीच. या चिखलाच्या वाटेमुळे एका आजीबाईच्या पार्थिवाला तिच्या नातेवाईकांना खांदा देता आला नाही. अखेरीस शववाहिनीतून आजीबाईंचे पार्थिव स्मशानात नेण्याची वेळ तिच्या नातेवाईकांवर आली. इमारतीतील नागरिकांसह आजीबाईच्या नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. इमारतीसमोर रस्ता महापालिका कधी करणार आहे असा सवाल उपस्थित केला आहे.