कल्याण-शीळ रोडवर आधीच प्रचंड वाहतूक कोंडी असताना मध्यरात्री मोठा दिशादर्शक फलक अचानक रस्त्यावर कोसळला. त्यामुळे काही काळ दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली. या घटनेत एक बाइकस्वार थोडक्यात बचावला. मनसे नेते राजू पाटील आणि पदाधिकारी योगेश पाटील घटनास्थळी पोहोचून पोलिस व अग्निशमन दलाच्या मदतीने फलक बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.