कल्याण-शिळ रस्त्यावर CCTV कॅमेरे बंद असल्याने चोरी व अपघातांच्या तपासात मोठा अडथळा निर्माण झाल्याचे समोर आले आहे. मेट्रो कामामुळे स्मार्ट सिटी अंतर्गत बसवलेले कॅमेरे बंद पडले आहेत. पोलिसांकडे मागवलेल्या १४७ फुटेजपैकी फक्त ६९ उपलब्ध झाल्याने सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यामुळे प्रशासनाकडून नागरिकांची सुरक्षा रामभरोसे सोडले आहे का? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.