शिर्डीत खासदार अभिनेत्री कंगना राणावत यांनी कुटुंबीयांसह साईबाबांच्या धूप आरतीला हजेरी लावली. यावेळी राज ठाकरे यांची कन्या उर्वशी ठाकरेही उपस्थित होती, मात्र माध्यमांचे कॅमेरे पाहून तिने कंगनापासून अंतर राखलं. दर्शनानंतर कंगनाने शिर्डीतील स्वच्छतेचं कौतुक केलं आणि झाशीच्या राणीच्या भूमिकेमुळे आपल्याला नवजीवन मिळालं असल्याचं सांगितलं. भारतीय वीरांगणांवर आणखी चित्रपट व्हावेत, अशी इच्छा व्यक्त करत तिने राजकीय प्रश्नांवर भाष्य टाळलं.